प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेलकडून पनवेलमध्ये वृक्षारोपण

पनवेल प्रतिनिधी....प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेल कडून रविवार दि. 15 रोजी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकातील गार्डन मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजयोगिनी बीके संतोषदीदीजी, पनवेलच्या प्रमुख बी के तारा दीदी, महापौर डॉ कविता चोतमोल, डॉ शुभदा नील, डॉ संजीवनी गुणे, पत्रकार मिलिंद खारपाटील, नगरसेविका राजश्री वावेकर, लायन्स क्लब च्या अध्यक्षा निशा शर्मा, बी के मालादिदी सायन, बी के शीलादीदी वाशी, बी के भारतीदीदी अलिबाग, बी के मंदादिदी रोहा, बी के शुभांगीदीदी सीबीडी बेलापूर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संतोषदीदीजी आणि तारादीदी यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पूर्वीचा सुजलाम आणि सुफलाम हिंदुस्थान आपल्याला बनवायचा आहे असे सांगून वृक्ष लावा, पर्यावरण जोपासा असे आवाहन केले.
पनवेलच्या महापौर सौ कविता चौतमाल म्हणाल्या की 2 वर्षांपूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार 3 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करून आपण त्यांची वाढ करू या. यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या भागात पाऊस पडत नाही तीथे नक्की पाऊस पडेल.
यानंतर उपस्थित शेकडो ब्रह्माकुमारीज परिवारा कडून वृक्षारोपण करण्यात येऊन हे सर्व वृक्ष वाढवू असे अभिवचन सर्वानी दिले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे पनवेलमधील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

राजयोगिनी बीके संतोषदीदीजी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश झोनल इन्चार्ज
बी के तारा दीदी पनवेल
डॉ कविता चोतमोल महापौर
डॉ शुभदा नील
डॉ संजीवनी गुने
मिलिंद खारपाटिल पत्रकार
राजश्री वावेकर नगरसेवक
निशा शर्मा प्रेसिडेंट लॉयन्स क्लब
बी के मालादिदी सायन
बी के शीलादीदी वाशी
बी के भारतीदीदी अलिबाग
बी के मंदादिदी रोहा
बी के शुभांगीदीदी सीबीडी बेलापूर
Prev:
Next: